जेष्ठ नागरिक संघ सातोसेच्या प्रजासत्ताकदिनी आयोजित स्नेहमेळाव्यात झाला सत्कार
*⚡सावंतवाडी ता.२७-:* ज्येष्ठ नागरिक संघ सातोसेच्या माध्यमातून 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत स्नेहा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा बँकेचे नूतन अध्यक्ष मनीष दळवी याचा हस्ते सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सातोसे गावचे सरपंच बबन सातोसकर, पत्रकार प्रविण मांजरेकर, सातोसे ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष पेडणेकर, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
