*⚡सावंतवाडी ता.२७-:* सातोसे ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने ७२ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी उपस्थित होते. यावेळी भाजप जिल्हा प्रवक्ते, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब देखील या कार्यक्रमात सहभागी झाले.
याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते संजू परब यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सातोसे सरपंच बबन सातोसकर, पत्रकार प्रवीण माजंरेकर, सातोसे जेष्ठ नागरीक संघ अध्यक्ष श्री. पेडणेकर, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
