सालईवाडा भागातील सांडपाणी आणि गटारमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात …

शिवसेना शाखा प्रमुख प्रतिक बांदेकर आक्रमक; प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी दिले निवेदन

*⚡सावंतवाडी ता.२४-:* शहरातील सालईवाडा भागात नगरपालिका प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे सांडपाणी आणि गटाराचा प्रश्न एरणीवर आला आहे. याबाबत निवेदनाद्वारे शिवसेना शाखा प्रमुख प्रतिक बांदेकर यांनी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

या भागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असून, गेली अनेक वर्ष या भागात नव नवीन इमारती होत आहेत. परंतु, जुन्या गटारांमुळे सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील अनेक ठिकाणची गटारे उघडी असल्याने दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या भागातील जलवाहिन्या भविष्यात मलवाहिण्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर योग्य वेळी योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे. या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तसेच काळया पाण्याचे झरे वाहत आहेत. अनेक ठिकाणचे सांडपाणी आणि गटार ही मोती तलावात जात आहेत. त्यामुळे भविष्यात मोती तलाव वाचवा मोहीम राबवावी लागेल. त्यामुळे यावर शासन स्तरावर तातडीने उपाय योजना करण्यात यावी. अशी मागणी शाखा प्रमुख प्रतिक बांदेकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यानी आज प्रशासनाला दिले आहे.

You cannot copy content of this page