शिवसेनेच्या माध्यमातून गवंडीवाड्याचा सर्वांगीण विकास करू…

हरी खोबरेकर ; ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठांचा सत्कार…

*⚡मालवण ता.२४-:* शिवसेनेत जात, पात भेद केला जात नाही. सर्वसामान्यांच्या उपयोगी पडण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे. त्यानुसार आमच्यासारखे कार्यकर्ते चांगले काम करत आहोत. यापुढेही करत राहू. येत्या काळात गवंडीवाड्याचा विकास शिवसेनेच्या माध्यमातून केला जाईल अशी ग्वाही शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी येथे केले.

मालवण गवंडीवाडा येथील शिवसेना शाखेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, वासू गावकर, सदानंद लुडबे, नगरसेविका सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, महिला संघटक पुनम चव्हाण, मंदार ओरसकर, अमेय देसाई, लारा देसाई, गौरव वेर्लेकर यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. खोबरेकर म्हणाले, बाळासाहेबांकडून जी कौतुकाची छाप पाठीवर मिळायची तीच ज्येष्ठांकडून मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या भागातील किनाऱ्यावर अस्वच्छतेची समस्या भेडसावत असून यासाठी मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. किनारे स्वच्छ राखण्यावर भर दिला जाईल. गवंडीवाड्यात भूमिगत विजवाहिन्या करण्यात येणार असून यामुळे या वाड्यातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार टळतील. श्री. कांदळगावकर म्हणाले, शिवसेनेत आपल्याला मान, सन्मान मिळाला. या पक्षामुळेच नगराध्यक्ष पद मिळाले. नगराध्यक्ष म्हणून गेल्या पाच वर्षांच्या काळात शहरातील सर्व प्रभागातील विकासकामे मार्गी लावण्यावर भर दिला. विरोधकांच्या प्रभागातील कामे करण्यात आली. किनाऱ्यावर अस्वच्छतेचा गंभीर विषय आहे. हा प्रश्न एकटी पालिका सोडवू शकत नाही तर किनाऱ्यासह आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यायला हवे तरच मालवण शहर स्वच्छ बनेल.

यावेळी भाई गोवेकर, पूनम चव्हाण, सेजल परब, मंदार ओरसकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचा कार्यकर्ता संचित देसाई याचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन करत पलाश चव्हाण यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page