जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा कणकवली नगरपंचायतच्या वतीने सत्कार

*⚡कणकवली ता.२४-:* राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनलचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह नवनिर्वाचित संचालकांचा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हा बँकेच्या विजया नंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व नवनिर्वाचित संचालकांनी पहिल्यांदाच कणकवली नगरपंचायत मध्ये भेट दिली. त्या वेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे संचालक प्रज्ञा ढवण, विठ्ठल देसाई, समीर सावंत यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक रवींद्र गायकवाड, अभिजीत मुसळे, ऍड. विराज भोसले, माजी नगरसेवक बंडू गांगण, महेश सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page