*⚡मालवण ता.२४-:* महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने सन २०२१- २२ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी माध्यमिक विद्यालय बिळवस येथील इंग्रजी विषयाच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम यांच्या हेल्थ इंग्लिश लँग्वेज स्टडी ऑन गुगल फॉर्म या नवोपक्रमाची जिल्ह्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
मागील वर्षी सुद्धा सौ. अनुष्का कदम यांच्या नवोपक्रमाची निवड झाली होती. मागील दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद होत्या. पण विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. सौ. कदम यांनी या ऑनलाईन टिचिंगचा उपयोग करून इयत्ता दहावी साठी गुगल फॉर्म चा वापर केला. व नावीन्य पद्धतीने अध्यापनाचे कार्य केले. त्यांच्या या नाविन्यपूर्ण नवोपक्रमाची जिल्हास्तरावर दखल घेऊन राज्यस्तरावर पात्र झाला आहे. सौ. अनुष्का कदम यांच्या या यशाबद्दल बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव, सचिव अशोक पालव, डाएटच्या प्राचार्या सौ. ए. पी. तपशीकर, प्रशालेचे मुख्याध्यापक जयवंत ठाकूर तसेच सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
