रोटरी क्लब तर्फे वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

सावंतवाडी-: भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्यध्यापिका, स्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, समस्त स्रियांना उजेडाची वाट दाखविणा-या “क्रांतीज्योती” सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा उत्सव रोटरी क्लब, सावंतवाडीने वुमन्स कॉलेज अॉफ काॕम्पुटर सायन्स आणि रिसर्च – सावंतवाडी येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्य वक्ते म्हणून माजी प्राचार्य श्री.अल्ताफ खान लाभले. त्यांच्या हस्ते “क्रांतीज्योती” सावित्रीबाई फुले यांच्या तसबिरीला फुलमाळा वाहुन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रोटरी क्लबचे सचिव रो.दिलीप म्हापसेकर यानी कार्यक्रमांचे प्रास्ताविक करुन उपस्थितांचे फुलांचे गुच्छ देऊन स्वागत केले.

मुख्य वक्ते श्री.अल्ताफ खान यानी आपल्या ओधवत्या शैलीत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की समस्त भारतिय स्रियांनी या जननीला कायम स्मरणात ठेवणे गरजेचे आहे. कारण “आम्ही सावित्रीच्या लेकी, चांगले दिवस आलेत आमच्या लेखी.” हे सांगताना स्री शिकली प्रगती झाली. हे आजचे वास्तव्य आहे. आज स्री ॲटोरिक्षे पासुन अंतराळाला गवसणी घालु शकली ती केवळ शिक्षणामुळेच. आज विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातच या माऊलीला सुरवातीच्या काळात प्रचंड विरोधाला आणि मनस्तापाला सामोरे जावे लागले. पण महात्मा ज्योतिबा फुले या त्याच्या पतीच्या पाठींब्यामुळे हे महान कार्य त्याच्या कडून घडत गेले. समाजा बरोबर स्वकीयांनी ही पाठ फिरविली. पण मागे न हटता जिद्दीने आपले कार्य अविरत चालु ठेवले. अशा शब्दांत सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव अल्ताफ खान सरानी केला. यावेळी संस्थेचे चेअरमन रो.संतोष सावंत, रोटरी क्लबचे सचिव रो.दिलीप म्हापसेकर, प्रभारी प्राचार्य स्वप्नील गडकरी, रो.अनंत उचगावकर, रो.सत्यजित धारणकर आणि रो.प्रमोद भागवत व्यासपीठावर उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य स्वप्नील गडकरी यानी शुभेच्छा दिल्या. रो.सत्यजित यानी सुत्रसंचालन केले आणि रो.भागवत यानी आभार प्रदर्शन केले. यावेळी कॉलेजचे धनंजय बल्लाळ आणि प्राध्यापक आणि 35 विद्यार्थीनी उपस्थित होत्या. हे या दिवसाचे मोठे यश होते अशी प्रतिक्रिया रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ यानी व्यक्त केली.

You cannot copy content of this page