कबड्डीपटू रिद्धी हडकर हीचा शहर भाजपकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार…

खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेत निवड झाल्याने करण्यात आला सत्कार…

मालवण दि प्रतिनिधी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेली मालवणची सुकन्या कबड्डीपटू रिद्धी नितीन हडकर हिचा शहर भाजपच्या शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रिद्धी हडकर हिची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. याबद्दल शहर भाजपच्या वतीने येथील भाजपा कार्यालयात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आबा हडकर, माजी नगरसेवक तथा राष्ट्रीय खेळाडू उत्तम पेडणेकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, राजू बिडये, बाबू धुरी, नितीन हडकर, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण, कौशिक खवणेकर, दुर्गेश गावकर, धनंजय मांजरेकर आदी उपस्थित होते. फोटो मालवणची कबड्डीपटू रिद्धी हडकर हिचा नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते मालवण शहर भाजपच्या शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आबा हडकर जगदीश गावकर, ललित चव्हाण, राजू बिडये, बाबू धुरी व इतर

You cannot copy content of this page