मुक्ताई अॅकेडमीच्या बुद्धिबळ व कॅरम स्पर्धेत आयुष राठोड, यशराज गवंडे विजयी

*⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडीतील मुक्ताई बुदधिबळ व कॅरम कोचिंग अॅकेडमीने मुला-मुलींसाठी तिस-या बुदधिबळ व कॅरम लीग स्पर्धांचे आयोजन केले होते.कोविड कालावधीतील सर्व नियमांचे पालन करुन स्पर्धा चार दिवस खेळविण्यात आली.स्पर्धेत अॅकेडमीच्या 38 मुला-मुलींनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू कुमार बाळकृष्ण पेडणेकर याच्या शुभहस्ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक श्री.सुर्यकांत पेडणेकर, उज्वल फोटो स्टुडीओचे श्री.मकरंद मेस्त्री, अॅकेडमीचे संचालक श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि संचालिका सौ.स्नेहा पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना मान्यवर कुमार बाळकृष्ण पेडणेकर, श्री.सुर्यकांत पेडणेकर, श्री.मकरंद मेस्त्री, श्री.कौस्तुभ पेडणेकर, सौ.स्नेहा पेडणेकर यांच्या हस्ते रोख पारीतोषिके, मेडल्स आणि प्रशस्तिपत्रं देऊन गौरविण्यात आले.या वेळी श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी पुढील महिन्यात जिल्हास्तरीय बुदधिबळ व कॅरम स्पर्धांचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले. बुदधिबळ विजेते – 1]मुख्य गट – प्रथम आयुष राठोड, द्वितीय विभव राऊळ, तृतीय राजेश विरनोडकर 2]16 वर्षांखालील मुले विजेता भावेश कुडतरकर 3]13 वर्षांखालील मुली विजेती भुमि कामत 4]11 वर्षांखालील मुले विजेता योगी लेले कॅरम विजेते – प्रथम यशराज गवंडे, द्वितीय साक्षी रामदुरकर, तृतीय पारस गवस, चतुर्थ अभिराज आडारकर

You cannot copy content of this page