*⚡कणकवली ता.२१-:* जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत न्युट्रिटीव्ह स्लाईस- बिस्कीट पुड्यांचे वाटप आज शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.गौरी शिंदे व माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या ८ सप्टेंबर २०२१ च्या नवीन परिपत्रकानुसार शालेय पोषण आहार योजनेअतर्गत प्रत्येक महिन्याच्या २४ दिवसाकरिता इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना तांदूळ,बाजरी, ज्वारी,नाचणी,सोयाबीन,एकूण ६ बिस्कीट पुढे प्रत्येकी विदयार्थ्यांना देण्यात आले.तर इयत्ता ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांना बाजरी,ज्वारी, नाचणी,सोयाबिन यांचे प्रत्येकी २ बिस्कीट पुडे व तांदूळ -१ बिस्कीट पुडा असे एकूण प्रति विद्यार्थी ९ बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक पॅकेट १२० ग्रॅम वजनाचे असून त्यात १६ स्लाईस ( बिस्किटे ) आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत फक्त मर्यादित पालकांना बोलावून विदयार्थ्यांना देण्यात येणाऱ्या या बिस्कीट पुड्यांचे वाटप खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्यध्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक संजय राऊळ, श्रीम.स्मिता कोरगावकर आदी उपस्थित होते.
