*💫वेंगुर्ला दि.०२-:* वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी एकही अर्ज अवैध ठरला नसल्याची माहिती नायब तहसिलदार संतोष बांदेकर यांनी दिली आहे. आरवली व सागरतीर्थ या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत असून यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. सागरतीर्थ ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २२ तर आरवली ग्रामपंचायतीसाठी ३३ असे एकूण ५५ अर्ज दाखल झाले होते. या अर्जांमधून एकही अर्ज अवैध ठरला नाही.
आरवली व सागरतीर्थ सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दाखल सर्व अर्ज वैध
