नांदगाव येथे ग्रामदक्षता समिती च्यावतीने रेशन दुकानदार यांचा गौरव.

*💫कणकवली दि.०१-:* नांदगाव येथे ग्रामदक्षता समिती च्यावतीने रेशन दुकानदार मिलिंद शिरसाट यांचा कोविड योध्दा म्हणून शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. नांदगाव येथे ग्रामदक्षता समितीची बैठक नुकतीच तलाठी कार्यालयात सरपंच अफ्रोजा नावलेकर याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . या वेळी नांदगाव येथील रेशन धान्य पुरवठा करणारे मिलिंद शिरसाट यांनी कोरोना च्या वेळी नांदगाव व इतर भागात रेशन धान्य साठी जोडले आहेत त्याना योग्य नियोजन करून व त्यांच्या शी संपर्क साधून त्यांना त्यांच्या घरी जाऊन पोच केले कोरोना च्या काळात त्यांनी अत्यंत महत्त्वाचे काम केले . यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच नांदगाव येथे ग्रामदक्षता समिती सदस्य रज्जाक बटवाले यांच्या संकल्पनेतून या सभेत त्याचा गौरव सरपंच याच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नांदगाव सरपंच अफ्रोजा नावलेकर तलाठी एस सी अलकुटे ग्रामविस्तार अधिकारी पी एन हरमळकर मंडल अधिकारी जाधव मॅडम सदस्या सौ.वृषाली मोरजकर , रज्जाक बटवाले धान्य दुकानदार मिलिंद शिरसाट आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page