सावंतवाडी-: झाराप पत्रदावी हायवे वर मळगाव ब्रिज जवळ मोटरसायकल आणी चारचाकी मध्ये भीषण अपघात झाला असून, या अपघातात मोटरसायकवरील तिघे जण जख्मी झाले आहेत. त्यांना तात्काळ नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यातील एका व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून,त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलवण्यात येणार आहे. मुंबई पासिंग चारचाकीने दुचाकीस्वाराला सर्विस रोड जवळ धडक दिल्याने झाला आहे. हा अपघात आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडला आहे.
मळगाव ब्रीजवर अपघातात तीन जण जख्मी
