शिक्षक भरती प्रक्रिया तातडीने सुरु करा

माध्यमिक मुख्याध्यापक संघाची मागणी;अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा

*⚡कुडाळ ता.०८-: गेली काही वर्षे शासनाने रखडत ठेवलेली शिक्षक भरती प्रक्रिया तातडीने सुरु न केल्यास जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कुडाळ तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विवेकानंद बालम यांनी दिला आहे. कुडाळ तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची सभा नुकतीच पार पडली.

यावेळी सचिव अजित परब, माजी अध्यक्ष अशोक येजरे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव गुरुदास कुसगावकर, चंद्रकांत पंडीत, अजय शिंदे, अमृतराव जगताप, प्रकाश कुबल,मराठे सर आदी उपस्थित होते. गेली आठ ते दहा वर्षे शिक्षक भरती बंद आहे. या कालावधीत शेकडो शिक्षक सेवानिवृत्त झाले त्यांच्या जागी दुसरा शिक्षक नाही काही विद्यालयामध्ये पाच शिक्षकांपैकी चार शिक्षक निवृत्त झाले तर या शाळेत आज तीन वर्ग अणि एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कधीही भरुन न येणारे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने त्वरित शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी किंवा संस्थेला भरतीचे अधिकार द्यावेत अशी मागणी करण्यात आली.

यावेळी जनसेवा निधी संस्थेचा आदर्श मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार प्राप्त गुरुदास कुसगावकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच पी एच डी प्राप्त वाडोस विदयालयाचे शिक्षक आनंद राठीये,,सेवा निवृत्त रचना मोडक, मुख्याध्यापक प्रेमनाथ वालावलकर, नागेश नार्वेकर, राजन कर्पे, मरियान बारदेस्कर, अनंत जामसंडेकर, आदींचा संघातर्फे सत्कार करण्यात आला. आभार सचिव अजित परब यांनी मानले.

You cannot copy content of this page