श्री. अनंत स्मृती ट्रस्टच्या कॉन्व्हेंट स्कूलचा भूमिपूजन समारंभ संपन्न

बी एस सी नर्सिंग झालेल्या मुलींनी यूपीएससी एमपीएससी परीक्षा देऊन बनावे अधिकारी – के. मंजू लक्ष्मी

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शिक्षणाचे महत्व समजले असून गरीब कुटुंबातील मुलीही उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत. त्यात श्री अनंत स्मृती ट्रस्टच्या नर्सिंग कॉलेज अशा मुलींना चांगले शिक्षण देवून उत्कृष्ठ अशा नर्सेस तयार करीत आहे. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन करतानाच बीएससी नर्सिंग झालेल्या मुलींनीही यूपीएससी एमपीएससी ची परीक्षा देवून अधिकारी बनावे असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांनी कसाल येथील श्री अनंत स्मृति ट्रस्टच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळा उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांना केले . श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल या इमारतीचे भूमिपूजन सोहळा आज जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .यावेळी पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर, कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंद सावंत, सचिव यशवंत परब अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक चिराग बांदेकर ,कसाल सरपंच संगीता परब उपसरपंच दत्‍ताराम सावंत, कसाल मंडळाधिकारी मंगेश हांगे, नवीन बांदेकर अवधूत मालवणकर, शिक्षक तसेच विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

You cannot copy content of this page