नितेश परीटचा मडुऱ्यात सत्कार

शिल्पकला परीक्षेत राज्यात प्राप्त केला प्रथम क्रमांक

*💫बांदा दि.३०-:* मडुरा येथील नितेश परीट या विद्यार्थ्यांने शिल्पकला पदविका परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मडुरा श्री देवी माऊली देवस्थान समितीमार्फत सत्कार करण्यात आला. मुंबई येथील जे जे आर्ट महाविद्यालयातून नितेश ७८.५० टक्के विक्रमी गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष आनंद परब, सचिव संतोष परब, पदाधिकारी सोमनाथ परब, विजय परब, प्रमुख मानकरी दत्ताराम परब, केशव परब, नवरात्रोत्सव समिती माजी अध्यक्ष अनंत परब, विजय परब, भूषण परब, शशिकांत परीट, आनंद नाईक आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात संतोष परब यांनी नितेशने मिळविलेले यश गावासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. नितेशने आपल्या यशाचे श्रेय आईवडील, कुटुंबिय, चित्रकार एस. बी. पोलाजी व महाविद्यालयातील शिक्षकांना दिले. आभार संतोष परब यांनी मानले.

You cannot copy content of this page