*💫सावंतवाडी दि.३०-:* सावंतवाडीतील जनतेने वर्षभरापूर्वी याच दिवशी नगराध्यक्ष म्हणून आपणाला निवडून दिले होते. त्यानंतर या एका वर्षाच्या कालावधीत आपण शहराचा विकास कशा पद्धतीत केला हे दाखवण्यासाठी आज लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा होत आहे. पुढील १ वर्षात नाथ पै सभागृह देखील सावंतवाडीच्या जनतेच्या सेवेसाठी सज्ज असेल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. बॅ नाथ पै सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी परब बोलत होते. परब पुढे म्हणाले, कोरोना सारख्या कठीण काळात देखील निधी मिळवून ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत पुढील एका वर्षात नाथ पै सभागृह सावंतवाडीच्या जनतेच्या सेवेसाठी सज्ज असेल. जानेवारीत नगराध्यक्ष खुर्चीवर बसल्यावर आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लगेच फेंब्रुवारी महिन्याच्या अखेरीस २ कोटी ७३ लाखाची व्यवस्था या सभागृहासाठी केली आहे, परब यांनी सांगितले. यावेळी गेल्या एका वर्षात राज्य सरकारने नगरपालिकेसाठी एक रुपया देखील दिला नसून विरोधक निधी दिला म्हणून आरडाओरड करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नगरपालिकेला ११ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. त्यांच्यामुळेच ही विकास कामे शक्य झाली त्यामुळे त्यांचे जाहीर आभार देखील परब यांनी यावेळी मानले.
पुढील वर्षात नाथ पै सभागृह सावंतवाडी जनतेच्या सेवेसाठी सज्ज असेल-:संजू परब…
