परशुराम उपरकर यांचा आरोप; मुलासाठी मोर्चाचा इशारा देणाऱ्या राणेंनी कधी कार्यकर्त्यांसाठी मोर्चा काढला का..?
*⚡सावंतवाडी ता.२७-:* आमदार दीपक केसरकर यांना जर धमकीचे फोन येत असतील आणि ते त्याची तक्रार पोलिसांत देत नसतील तर ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून स्वतःच दहशतवादा खतपाणी घालत आहेत. असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
ते बोलताना पुढे म्हणाले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपला मुलगा जेल मध्ये जाईल या भीतीने मोर्चा काढण्याचा इशारा देत आहेत. परंतु, सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अनेकवेळा हल्ले झाले, ते जेल मध्ये गेले तेव्हा कधी त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी मोर्चे काढले नाही. ही मोठी शोकांतिका आहे. असा आरोप नारायण राणे यांच्यावर केला आहे. आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
