माजी खासदार निलेश राणे यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका*
*💫सावंतवाडी दि.३०-:* येथील विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी आलेले माजी खासदार निलेश राणे यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील जलतरण तलावाचे उद्घाटन वेळी त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या वर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, उद्घाटनाला नाही, निदान पोहायला तरी पालकमंत्र्यांना यावे असा जोरदार टोला लगावला आहे. पालकमंत्री उदय सामंत आपल्या मतदार संघातील विहीर देखील बुझवत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
