शिवसैनिक हल्ल्यातील “त्या” पाचही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी

संतोष परब खुनी हल्ल्याप्रकरण; तपासाबाबत पोलिसांकडून गुप्तता

*⚡कणकवली ता.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक,प्रचार प्रमुख, मजूर संस्था संचालक, करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला १८ डिसेंबरला झाला होता.याप्रकरणी ५ संशयित आरोपींना आज कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.यावेळी नरडवे नाका,कोर्ट परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कणकवली न्यायालयात सदर गुन्ह्यात आरोपींना हजर केले असता सरकारी पक्षातर्फे आरोपींना पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. या गुन्ह्यात अन्यही काही आरोपींना हात आहे.अन्य दोन आरोपींना अटक करावयाची आहे. त्यामुळे ५ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली. त्यावर आरोपींच्या वतीने वकिलांनी तपास करण्यासाठी यापूर्वी पोलीस कोठडी दिली होती,आता कोठडीत वाढ करु नये,असे म्हणणे मांडले.त्यावर सुनावणी करत कणकवली न्यायालयाने पाचही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आरोपींची रवानगी सावंतवाडी कारागृहातमध्ये करण्यात येणार आहे. कणकवली दिवाणी न्यायालयात सदर आरोपींना हजर करण्यात आले.या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नयेत. या साठी कणकवली मध्ये दंगल नियंत्रण पथक व आर.सी. पी पथक कणकवली दिवाणी न्यायालय लगत शिवसेना शाखेसमोरच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात होता.

You cannot copy content of this page