तालुक्यातील ११ ही ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा भगवा फडकणार- रुपेश राऊळ

*💫सावंतवाडी दि.२९-:* तालुक्यातील ११ ही ग्रामपंचायत वर सत्ता आणण्यासाठी आम्ही पूर्ण मोर्चे बांधणी केली असून, सर्व ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याची माहिती आज तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी आरोंदा येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, येणाऱ्या काही दिवसात खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत आणखी काही पदाधिकारी शिवबंधन बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागल्याने जनतेचा कौल हा आता महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. त्यामुळे तालुक्यातील ११ ही ग्रामपंचायत वर महाविकास आघाडीचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे

You cannot copy content of this page