नितीन गडकरी यांचे आदेश;खासदार विनायक राऊत यांनी वेधले लक्ष
ओरोस : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन पॅकेजचे रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या पॅकेज सहाअंतर्गत आरवली ते कांटे आणि पॅकेज सातअंतर्गत कांटे ते वाकेड या दोन पॅकेजच्या रखडलेल्या कामासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार गडकरी यांनी अधिकारी व ठेकेदार यांची संयुक्त बैठक दिल्ली येथे आयोजित केली होती. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीमध्ये रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले.
