वेंगुर्ला प्रतिनिधी– रा.कृ.पाटकर हायस्कूलच्या सन १९७९ मधील इयत्ता दहावीच्या चारही तुकडीमधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन १२ डिसेंबर रोजी हायस्कूलच्या ज्युबिली हॉलमध्ये संपन्न झाले. यावेळी ५६ माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
४२ वर्षापूर्वी शिक्षण हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या या माजी विद्यार्थ्यांच्या भेटीत अमाप उत्साह दिसून आला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. विशेष म्हणजे या तुकडीतील आपल्या व्यवसायानिमित्त आफ्रिका देशात स्थायिक झालेल्या माजी विद्यार्थ्याने व्हिडीओ कॉलद्वारे सर्वांशी संवाद साधला. यावेळी जयंत मोंडकर, नितीन कुबल, मनोज साळगांवकर, दिपक आंगचेकर, मारुती धुरी, किरण शिरोडकर, विकास मोर्ये, जेम्स फर्नांडीस, सुदन रेडकर, रवि शेटये, संजू कर्पे, ईशाद शेख, दिगंबर भोगटे, संगीता म्हापणकर, शुभांगी माळवदे, निला बागायतकर यांच्यासह अन्य माजी विद्यार्थी उपस्थित होते. फोटोओळी -१९७९ मधील इयत्ता दहावीच्या चारही तुकडीमधील उपस्थित माजी विद्यार्थी
