बाळकृष्ण गोरे यांना राष्ट्रीय रत्नमोती दशावतार कलागौरव पुरस्कार प्रदान

*जेष्ठ सिनेअभिनेते अरूण नलावडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

*💫सावंतवाडी दि.२९-:* बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचे मालक बाळकृष्ण ऊर्फ दिनेश गोरे यांना इचलकरंजी येथील ऐ जे व्हलेफेअर फाऊंडेशनच्या राष्ट्रीय रत्नमोती दशावतार कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संस्थेच्या सामाजिक कला साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध जेष्ठ सिनेअभिनेत अरूण नलावडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केज नगयपंचायीचे गटनेते हरूणभाई इनामदार पुण्याचे उद्योजक निसार सुतार इचलकरंजी बार असोसिएशन चे सक्रेटरी सचिन माने जगदाळे प्लाॅलेटेनिक काॅलेज चे संस्थापक धनाजीराव जगदाळे मोहळ नगरपरिषद अध्यक्षा शाहीन शेख उद्योजक कोशिक गायकवाड नवीमुंबई चे विभागीय अधिकारी सुरेश उमप आदी मान्यवर उपस्थित होते. दशावतार कलेत अल्पावधीतच त्यांनी ठसा उमठुन लाखो रसिकांचे चाहते बनले आहे दशावतार कलेतील दोन दशकातील त्याचे योगदान लक्षात घेऊन त्याचे या पुरस्कारा साठी निवड करण्यात आली यापूर्वी त्यांना लोककला क्षेत्रातील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबदल विविध क्षेत्रातील अभिनंदन होतं आहे.

You cannot copy content of this page