देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूक एकूण ७०.९२% मतदान

देवगड (प्रतिनिधी) .देवगड जामसंडे नगरपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ८७९६ मतदारांपैकी एकूण ६२३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण ७०.९२ % एवढे मतदान झाले .सर्वाधिक मतदान प्रभाग क्र.२ मध्ये ७८.७०% एवढे मतदान झाले .सर्वात कमी मतदान प्रभाग क्र१२देवगड सडा मध्ये ५९.७८% एवढे झाले.सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

प्रभाग निहाय मतदान पुढील प्रमाणे प्रभाग क्र१मध्ये एकूण मतदान ७००पैकी ५२८ एवढे मतदान झाले एकूण टक्केवारी ७५.४३% मतदान,प्रभाग क्र २मध्ये एकूण मतदान ५४० पैकी एकूण ४२५ मतदान,होऊन टक्केवारी ७८.७० एवढी आली.प्रभाग क्र.३मध्ये, एकूण ६४८ मतदान पैकी ४८० मतदान (७४.०७%)होऊन एकूण टक्केवारी ७४.७०%झाले.प्रभाग,क्र६ -६८० पैकी ४९५ (७२.७९) प्रभाग क्र -९- ६५७ पैकी ४६२ एवढे मतदान होऊन टक्केवारी ७०.३२ प्रभाग क्र १०-८३४ पैकी ५५७ मतदान ६६.७९%झाले.प्रभाग क्र११-एकूण मतदान -७४२ पैकी५५३ एवढे ७४.५३ % मतदान,प्रभाग क्र १२-एकूण मतदार ९१०पैकी ५४४ मतदान होऊन एकूण टक्केवारी ५९.७८ झाली. प्रभाग क्र १३ एकूण मतदार ५७१ पैकी ३७७ एवढे मतदान होऊन ६६.०२%आली.

प्रभाग क्र १४ -एकूण मतदान ५६० मतदानपैकी एकूण मतदान ४२७ टक्केवारी ७६.२५% मतदारांनी हक्क बजावला.प्रभाग क १५ -एकूण मतदान ४७४ पैकी ३०७ मतदान होवुन एकूण टक्केवारी ६४.७७%एवढे झाले मतदान प्रभाग क्र .१६ एकूण मतदान पैकी ७८० पैकी ५८७ मतदान झाले एकूण टक्केवारी ७५.२६.%प्रभाग क्र १७ एकूण मतदान ७०० मतदार पैकी एकूण ४९६ मतदान ,होऊन एकूण टक्केवारी ७०.८६%झाले.

You cannot copy content of this page