देवबाग प्रभाग तीनच्या निवडणुकीत ५४.७७ टक्के मतदान

*⚡मालवण ता.२१-:* मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये आज देवबाग ग्रामपंचायत मधील प्रभाग तीन च्या रिक्त जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या जागेसाठी दोन उमेदवार निवडणुक रिंगणात असून या जागेसाठी ५४.७७ टक्के मतदान झाले.

मालवण तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यातील काही जागा बिनविरोध झाल्या. तर ओबीसी आरक्षण असणाऱ्या जागांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाली. यामुळे आज मंगळवारी मतदानाच्या दिवशी केवळ देवबाग ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीन च्या जागेसाठी मतदान प्रक्रिया झाली. सर्वसाधारण राखीव असलेल्या या जागेसाठी रमेश पांडुरंग कद्रेकर विरुद्ध अपर्णा अरविंद धुरी या दोन उमेदवारांमध्ये लढत होत आहे. मंगळवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानास सुरुवात होऊन सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान पार पडले. प्रभाग तीन मधील ६३९ मतदारांपैकी ३५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे या जागेसाठी ५४.७७ टक्के एवढे मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीसाठी कृषी अधिकारी आर. जे. कांबळे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. उद्या २२ डिसेंबर रोजी मालवण तहसील कार्यालय येथे १० वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

You cannot copy content of this page