*⚡सावंतवाडी ता.२१– :* येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी आयुष विजय राठोड (आठवी) याने वेंगुर्ला नगरपरिषद आयोजित नगराध्यक्ष चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा शितल अंगचेकर यांच्या हस्ते आयुषला प्रमाणपत्र, चषक व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. आयुष हा शहरातील मुक्ताई अकॅडमी येथे कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. सावंतवाडीतील एस. पी. के. कॉलेजचे इंग्रजी विषयाचे शिक्षक प्रा. विजय राठोड यांचा तो चिरंजीव आहे.
त्याच्या या घवघवीत यशाबद्दल मिलाग्रीसचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षकवृंद तसेच प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांनी अभिनंदन केले आहे.
