जि.प सीईओ प्रजित नायर व संघटना जिल्हाध्यक्ष श्री.हरिश्चंद्र आसयेकर सकारात्मक चर्चा ठरली यशस्वी;गुरुनाथ घाङी यांना पदोन्नती
सावंतवाडी : ग्रामपंचायत कर्मचारी गुरुनाथ घाङी यांची पदोन्नती अनेक वर्षे रखडली होती. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने दिलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. ज़िल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी घाडी यांना पदोन्नती देऊन त्यांची परिचरपदी नियुक्ती केली आहे.
गुरुनाथ घाङी हे ग्रामपंचायत कर्मचार्यांमधून वर्ग -४ पदी सेवेत होते. त्यांची पदोन्नती बरीच वर्षे रखडल्याने त्यांच्यावर अन्याय झाला होता. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलने करण्यात आली. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी नायर यांचे घाङी यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत लक्ष वेधले. याबाबत नायर व आसयेकर यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.
अखेर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी घाडी यांना पदोन्नती देऊन त्यांची परिचरपदी नियुक्ती केली आहे. यासाठी ज़िल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, सामान्य प्रशासनचे राजेंद्र पराङकर, ग्रा.पं.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांचे महत्वाचे सहकार्य लाभले. त्यांचे आसयेकर यांनी आभार मानले.
