देवबाग ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी उद्या होणार मतदान

*⚡मालवण ता.२०-:* मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये उद्या केवळ देवबाग ग्रामपंचायत मधील प्रभाग तीन च्या रिक्त जागेसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. यापूर्वी मालवण तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यातील काही जागा बिनविरोध झाल्या. तर ओबीसी आरक्षण असणाऱ्या जागांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाली. यामुळे उद्या २१ डिसेंबरला मतदानाच्या दिवशी केवळ देवबाग ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीन च्या जागेसाठी मतदान होणार आहे. सर्वसाधारण राखीव असलेल्या या जागेसाठी रमेश पांडुरंग कद्रेकर विरुद्ध अपर्णा अरविंद धुरी या दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी कृषी अधिकारी आर. जे. कांबळे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर दि. २२ डिसेंबर रोजी तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे.

You cannot copy content of this page