राष्ट्रवादीचे नेते आबिद नाईक यांनी केले विशेष प्रयत्न…
*⚡कणकवली ता.२०-:* कणकवली येथील शिवडाव चिंचाळवाडी रस्ता डांबरी करणाच्या कामाचे आज भूमिपूजन सोहळा राष्ट्रवादीचे नेते आबिद नाईक यांच्या उपस्थितीत काशिराम शिरसाठ, सरपंच सौ वनिता जाधव, उपसरपंच लऊ वालके यांच्या हस्ते करण्यात आले. हा रस्ता होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक आबीद नाईक यांनी विशेष प्रयत्न करत पाठपुरावा करून, आमदार अनिकेत तटकरे यांच्या शिफारशीने जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यातून वर्ष 20-21 ला मंजूर करून दिले होते. यावेळी उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी आबिद नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.
