संत रोहिदास पतसंस्थेच्या संचालक मंडळावर माजी नगरसेवक विलास जाधव यांची बिनविरोध निवड

सावंतवाडी-:सावंतवाडी येथील संत रोहिदास पतसंस्थेच्या संचालक मंडळावर सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते विलास जाधव यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, अभय पंडित, रवी जाधव, इफ्तीगार राजगुरू आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page