वैभववाडी न प निवडणुकीसाठी सेनेकडून रवींद्र रावराणे प्रभारी

संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिले नियुक्तीपत्र

वैभववाडी प्रतिनिधी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतच्या निवडणूक प्रभारी पदी वाभवे वैभववाडी नगरपंचायत माजी नगराध्यक्ष रविंद्र रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाभवे-वैभववाडी न. पं. ची निवडणूकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रविंद्र रावराणे यांच्या खांद्यावर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेना कोल्हापूर- सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र रविंद्र रावराणे यांना देण्यात आले. यावेळी कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना स्थानिक जिल्हा नेते- अतुल रावराणे, उपजिल्हा प्रमुख – नंदू शिंदे, तालुका प्रमुख – मंगेश लोके, बँक संचालक -दिगंबर पाटील, युवासेना जिल्हा चिटणीस- स्वप्नील धुरी, जिल्हा परिषद सदस्य -दिव्या पाचकूडे,तालुका संघटक -अशोक रावराणे,संभाजी रावराणे, शहर प्रमुख- प्रदीप रावराणे, माजी नगराध्यक्ष – संजय चव्हाण, विभाग प्रमुख -अनिल नराम, विठोजी पाटील,रणजित तावडे , रोहित रावराणे, अनिता करकोटे, सुंदराबाई निकम, संजय निकम, रवींद्र चव्हाण, चित्रसेन होळकर , सुनील रावराणे , निकिता आंग्रे,शुभांगी कुडतरकर आदी पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page