मालवणला निधीची कमतरता भासू देणार नाही

खासदार विनायक राऊत:आचरा, वायंगणीत विकासकामांचे भूमिजन;आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती

मालवण दि प्रतिनिधी मालवण मधील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. लागेल तेवढा निधी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी उपलब्ध करून देऊ. येणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी शिवसेनेच्या पाठीशी खंबीर राहून शिवसेना उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी येथे बोलताना केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आचरा पावणाई मंदिर डोंगरेवाडी ते पारवाडी गणपती मंदिर रस्त्यासाठी ३ कोटी ३५ लाख मंजूर निधी तर वायंगणी बौद्धवाडी सापळेबाग ते तोंडवळी रस्त्यासाठी ४ कोटी ७२ लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही कामांची भूमिपूजने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आचरा देवूळवाडी, वायंगणी येथे करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपजिल्हाप्रमुख शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,श्रीकांत सांबारी, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, जगदीश पांगे, आबा दुखंडे, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, विनायक परब, ग्रा. प. सदस्या व आचरा विभाग प्रमुख अनुष्का गावकर, तोंडवळी सरपंच आबा कांदळकर, वायंगणी सरपंच संजीवनी रेडकर, मंगेश गावकर, राजन गावकर,सदा राणे ,आचरा उपसरपंच पांडूरंग वायंगणकर, सुभाष धुरी, गणेश तोंडवळकर, राजन पांगे, बाबा सावंत, सदा राणे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना खा.विनायक राऊत यांनी कोरोनाच्या कालावधीत निधीची कमतरता असताना देखील आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच ही कामे मंजूर झाली आहेत. याबद्दल आ. नाईक यांचे खा. विनायक राऊत यांनी याप्रसंगी कौतुक केले. या वेळी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी रस्ते चांगले असतील तरच त्या त्या भागातील विकासाला गती मिळते. अतिवृष्टीमुळे जे जे रस्ते खराब झाले त्यांच्या दुरुस्ती साठी निधी मंजूर केला आहे. कोरोनामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम थांबले होते. मात्र आता रस्ता दुरुस्तीला सुरुवात करण्यात येत आहे. ज्या ठेकेदारांना रस्त्यांची व इतर कामे मिळाली आहेत त्यांनी ती कामे दर्जेदार करावीत. नागरिकांनी देखील या कामांवर लक्ष ठेवावे असे सांगितले. शेवटी समीर लब्दे यांनी आभार मानले .

You cannot copy content of this page