*💫मालवण दि.२५-:* वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा ८ वा वर्धापन दिन शनिवार दि. २६ ते सोमवार दि. २८ डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दि. २६ रोजी ९ वाजता स्वामी समर्थ मठातून वायंगणी गावात पालखी प्रस्थान, दुपारी १ वाजता ठाणेश्वर मंदिर येथे आगमन संध्याकाळी ७ वाजता मठात आगमन आणि आरती, दि. २७ रोजी सकाळी १० वाजता सामुदायिक सत्यदत्त महापुजा, दुपारी १२ वाजता महाआरती, दि. २८ रोजी सत्यनारायण पूजा आणि आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रम कोव्हीड १९ च्या साथीबाबत शासनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करून पार पडणार आहेत. तरी सर्व स्वामी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ मठ, वायंगणी तर्फे करण्यात आले आहे.
वायंगणी स्वामी समर्थ मठाचा आजपासून वर्धापन दिन कार्यक्रम
