त्या ४७ हजार कोटींच्या गुंतवणूकीत सिंधुदुर्ग-रत्नागिरीला दमदीही नाही-आ.नितेश राणे..

चिपी विमानतळावर स्थानिकांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत; ठाकरे सरकार कोकणच्या मुळावर उठल आहे

*💫कणकवली दि.२५-:* मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यकम उद्धव ठाकरे व उद्योग मंत्री याच्या उपस्थित झाला आहे.त्यात कोकणात ४७ हजार कोटी गुंतवणूक करण्यात आली आहे. विभाग निहाय कोकण विभाग मध्ये ७७ टक्के गुंतवणूक आहे.त्या ७७ टक्के गुंतवणूकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी एकही दमडी ठाकरे सरकारने दिली नाही, असा घणाघाती आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. कणकवली प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. कोकणातील ठाणे, पालघर रायगड या जिल्ह्यात गुंतवणूक आहे.गेल्या एक वर्षांपासून कोरोना काळ असताना सत्ताधारी जुन्या प्रकल्पात काहीही करत नाही. प्रकल्प पर्यटन काहीच कार्य नाही.सी वर्ल्ड प्रकल्प, एमआयडीसीत काहीच गुंतवणूक केली नाही.आमचा सिंधुदुर्ग दरडोई उत्पन्न ५ नंबरवर राज्यात होता, त्याचे काय होणार? ही आमची चिंता आम्हाला आहे. सिंधुदुर्गातील सत्ताधारी जनतेची दिशाभूल करून विकासापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला. उद्योग विभागाच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक सिंधुदुर्गात येत नसेल तर येथील तरुणांनी करण्याचे काय?आडाळी एमआयडीसी किती गुंतवणूक होणार?तरुणांनी करायचे काय? सिंधुदुर्ग रत्नागिरी का वगळली? तिकडे करणामुळे तिकडे कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो बेरोजगार जिल्ह्यात आलेले आहेत, त्यांना नोकऱ्या कुठून देणार?त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर भांडण याची गरज होती मात्र ही उद्योग क्षेत्रात होणारी गुंतवणूक होत असताना पालकमंत्री खासदार कुठे गेले होते?असा सवालही नितेश राणे यांनी व्यक्त केला. नाना प्रकल्पाबद्दल शिवसेनेचे आमदार वेगळी भूमिका घेत आहेत .स्थानिकांना प्रकल्प हवा असल्याने त्यांची भूमिका बदलली आहे मात्र शिवसेनेचे खासदार त्या प्रकल्पाला विरोध करून बेरोजगारांच्या पोटावर आणण्याचा प्रकार करत आहेत. ठाकरे सरकार या जिल्ह्याच्या प्रत्येक विषयांत अन्याय करत आहे.ही अधोगती होत आहे,वॉटर स्पोर्ट बाबत अद्याप ऑर्डर नाही. किंवा पर्यटक येणार आणि स्थानिकांना रोजगार मिळणार ,कोकणावर अन्याय आहे,तो जनतेसमोर आम्ही माडत आहोत. चिपी विमानतळ मध्ये चालू होत असताना नोकऱ्यांच्या माहिती दिली जात नाही. विमानतळावर काम करणारा एकही बाहेरचा माणूस असणार नाही.ट्रेंनिग द्यायचे आहेत,त्यांना आम्ही मदत करतो. अन्यथा चुकीच्या पद्धतीने नोकरभरती झाल्यास आम्ही गप्प बसणार असल्याचा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. .

You cannot copy content of this page