देवगड मोदी सरकारची चुकीची धोरणे,आणि उद्योगपती धार्जिन्या धोरणांमुळेच,सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे.सामान्य जनतेचे जगणे महाग करणाऱ्या मोदि सरकारचा जाहीर निषेध देवगड तालुका काँग्रेसच्या वतीने नागरिक व व्यापाऱ्यांना पत्रके वाटून करण्यात आला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले याच्या आदेशानुसार जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर आंदोलन करण्यात येत असून त्या अनुषंगाने मनाई आदेशाचे पालन करून महागाईचा निषेध करीत पत्रक वाटप करण्यात आली .यावेळी देवगड तालुका काँग्रेस अध्यक्ष उल्हास मणचेकर,सेक्रेटरी सजाउद्दीन सोलकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेश देवगडकर विभाग अध्यक्ष उमेश कुळकणीं,मनोज पारकर,निलेश ढोके, गणपत वालकर,सुनील सकपाळ,प्रभाकर यादव,धनंजय मुणगेकर उपस्थित होते. कोण बहुत हुई महंगाई की मार, बस करो मोदी सरकार या घोषणेच्या अनुषंगाने, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षाच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे.दिवसेंदीवस प्रत्येक वस्तू,महाग होत आहे.पेट्रोल,डिझेल,स्वयंपाकाचा गॅस,आता सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.मोदी सरकारने जनतेला कोणताही दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही.उलट कररूपाने करोडो रुपयांची लूट चालविली आहे.असेही या पत्रकात नमूद केले आहे.
सामान्य जनतेचे जगणे महाग करणाऱ्या मोदी सरकारचा तालुका काँग्रेसकडून नागरिक व व्यापाऱ्यांना पत्रके वाटून निषेध…
