*⚡देवगड ता.२०-:* शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव मध्ये शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम पार पडला. शिरगाव चे सुपुत्र गणेश सहदेव लोके यांनी त्यांची आई कै. सुगंधा सहदेव लोके यांच्या स्मरणार्थ इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिकत असलेल्या गरीब व होतकरू ७ विद्यार्थ्याचा शिक्षणाचा खर्च करण्याचे ठरविले त्या प्रमाणे त्यांनी आज शिष्यवृत्ती साठी निवडलेल्या ७ विद्यार्थ्याची शैक्षणिक फी चा रू ३१००/-धनादेश शाळेचे अधीक्षक रवींद्र जोगल व प्राचार्य शमशुद्दिन अत्तार यांना प्रदान केला. तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व संदेश पत्र प्रदान केले. या कार्यक्रमाला गणेश लोके व त्याचे वडील सहदेव लोके उपस्थित होते. गणेश लोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आईचे महत्व व आईने त्यांना दिलेली शिकवण व संस्कार त्यांना त्यांच्या आयुष्यात मोठे होण्यासाठी कसे उपयुक्त ठरले हे विषद केले. कार्यक्रमाला शाळा अधीक्षक रवींद्र जोगल, संस्था पदाधिकारी वसंत साटम,स्थानिक शाळा समिती सदस्य संदीप साटम, मंगेश लोके, विजय कदम सर, स्थानिक समिती पदाधिकारी व सदस्य. संतोष फाटक ,वसंत नाईक,राजेंद्र कदम, राजू शेटे, ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य शमशुद्दिन अत्तार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवींद्र तांबे सर यांनी केले सर्वाचे आभार रवींद्र तांबे यांनी मानले.
शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव येथे शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम संपन्न
