विंधन विहिरींसाठी ग्रा.प. पातळीवर एजन्सी उपलब्ध करा.-:संदिप नेमळेककर

पंचायत समिती मासिक बैठकीत मागणी

*💫सावंतवाडी दि.२४-:* तालुक्यातील गतवर्षीच्या पाणीटंचाई आराखड्यातील तीन विंधन विहिरीची कामे वगळता इतर कामे मशनरी अभावी रखडली आहेत त्यामुळे विंधन विहीर कामाबाबत ग्रामपंचायत पातळीवर एजन्सी उपलब्ध करून द्या अशी मागणी पंचायत समिती सदस्य संदीप नेमळेकर यांनी केली तर रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी जुन्या आराखड्याला प्राधान्य द्या अशा सूचना उपसभापती शितल राऊळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक आज उपसभापती शितल राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली ऑफलाइन पार पडली. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक उपस्थित होते. या बैठकीमध्ये विभागवार कामाचा आढावा घेण्यात आला. सभेच्या सुरुवातीला सदस्य रुपेश राव यांनी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका लक्षात घेता त्या ग्रामपंचायतीवर सद्यस्थितीत नेमण्यात आलेल्या प्रशासकाला आवश्यक दाखले उपलब्ध होण्यासाठी सलग तीन दिवस आलेल्या सुट्टीच्या दिवशी सुट्टी न देता ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना करा त्यामुळे संबंधित उमेदवारी अर्ज भरणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही दाखल्याची अडचण उपलब्ध होऊ नये अशी मागणी केली तर अशा प्रकारच्या सूचना आधीच संबंधित प्रकल्प शासकांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी पंचायत समिती स्तरावरून घेण्यात आली असल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री नाईक यांनी सांगितले.

You cannot copy content of this page