परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलरचा धुमाकूळ

स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे केले नुकसान

मालवण दि प्रतिनिधी मालवणसह सिंधुदुर्गच्या समुद्रात परराज्यातील पर्ससीन ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरूच असून पर्ससीन ट्रॉलर्स कडून पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहे मालवण तालुक्यातील तळाशील येथील दशरथ अनंत कोचरेकर यांनी समुद्रात मासेमारीसाठी टाकलेली न्हैय मासेमारीची जाळी (आवता) पर्ससीन टॉलर्सच्या अतिक्रमणामुळे तुटून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तळाशील येथील दशरथ अनंत कोचरेकर यांनी समुद्रात मासेमारीसाठी टाकलेली न्हैय मासेमारीची जाळी (आवता) रात्रीच्या वेळी ओढत असताना काही पर्ससीन ट्रॉलर्सनी जाळ्यांवरूनच मार्गक्रमणा केल्याने यात तीन जाळ्यांचे नुकसान झाले आहे रात्रीची वेळ असल्याने पर्ससीन ट्रॉलरचे नाव आणि नंबर समजू शकला नसल्याची माहिती कोचरेकर यांनी दिली सप्टेंबर २०१९ मध्ये देखील परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी कोचरेकर यांच्या जाळ्यांचे मोठे नुकसान केले होते. त्यावेळीही मस्य विभागाकडे याबाबत दाद मागूनही कोचरेकर यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. मत्स्य विभागाकडून केवळ नुकसानीची नोंद घेऊन राज्यपाल अहवालासाठी माहिती पाठवली जाते. शासनाने पर्ससीन ट्रॉलर्सच्या ‘अतिक्रमणामुळे होणाऱ्या नुकसानीची गंभीर दखल घेत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कोचरेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page