पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-:* राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सोमवार दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 7.30 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे आगमन व राखीव. मंगळवार दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समिती बैठक, दुपारी 2.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, दुपारी 3 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना ( कोविड – 19) संसर्गामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना शासनाने जाहीर केलेल्या 5 लक्ष रुपये एवढ्या रक्कमेचे मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.30 वा. ओरस येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण, दुपारी 4.15 वा. फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, सहायक आयुक्त (मत्स्य) व प्रादेशिक अधिकारी एमटीडीसी यांच्या समवेत शिरोडा स्पोर्ट्स क्लब बाबत संयुक्त बैठक व सादरीकरण. सायं. 5 वा. वेंगुर्ला पंचायत समिती येथे वेंगुर्ला पंचायत समिती नुतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. सायं. 6.30 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने सिंधुदुर्ग रेल्वे स्थानककडे प्रयाण. रात्री 8 वा. सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक येथे आगमन व मडगाव – मुंबई फेस्टीवल स्पेशल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

You cannot copy content of this page