महेश सारंग यांचा सतीश सावंत, एम. के. गावडे यांच्यावर निशाणा;शेतकरी, दुग्ध व्यवसायिकांना सावधगिरीचे आवाहन
*⚡सावंतवाडी ता.१३-:* जिल्हा बँकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ज़िल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, सिंधुदुर्ग दुग्ध संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांनी मेळावे घेऊन दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक सुरू केली आहे. या दोन्ही व्यक्तींच्या फसवेगिरीपासून शेतकरी तसेच दुग्ध व्यवसायिकानी सावध राहून आपले भविष्यातील नुकसान टाळावे, असे आवाहन महेश सारंग यांनी केले आहे. पत्रकात सारंग यांनी म्हटले आहे की, जिल्हा बँक चेअरमन सतिश सावंत, सिंधुदुर्ग दुग्ध संघाचे चेअरमन एम. के. गावडे जिल्हा बँक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दुग्ध उत्पादक संस्था व दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे मेळावे घेत आहेत. गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांना मेळाव्यात आमंत्रित करत दुग्ध उत्पादक संस्था आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करत आहेत. गोकुळ दूध संघाचे चेअरमन यांचे निमंत्रण पत्रिकेवर नांव छापून मेळावे घेतले जात आहेत. परंतु या मेळाव्यांकडे गोकुळ संस्थेचे चेअरमन पाटील मेळाव्यास उपस्थीत सर्व शेतकरी भ्रम निराश झाले. या दोन्ही व्यक्तीपासून दुग्ध सहकार क्षेत्रामध्ये सावधगीरी बाळगण्याची गरज आहे. कारण दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहली काढून काही संस्थाना गोकुळ संघाकडे नेऊन जिल्हातील दुग्ध संस्थाना गोकुळ दुध संघाकडून देण्यात आलेले कोड रद्द करण्याचे गोकुळ संघाकडे प्रयत्न सुरू केलेले आहेत. तसेच थेट दुध जिल्हा संघाला जिल्हयातील दुध संस्थानी दुध देण्यासाठी व जिल्हा संघाकडून गोकुळ संस्थेस दुध पुरवठा करण्यासाठी जिल्हा दुध संघाकडून जिल्हा संस्थाना कोड देण्याचा घाट रचला जात आहे. हा निर्णय सर्व संस्थाना व दुध उत्पादकाना धोकादायक आहे. मागील सर्व लेखाजोखा पहाता दुग्ध संघ व एम. के. गावडे यांच्या नेतृत्वाखाली चाललेले सिंधुदुर्ग दुग्ध संघ मागील देणे किती आहे हे दुध संघाला व काही संस्थाना यासंदर्भात माहितीही आहे. कारण असे जर दुग्ध संस्थाचे गोकुळने दिलेले कोड जर रदद केले तर याचा परिणाम जिल्हयात दुग्ध संस्थावर व दुध उत्पादकावर होणार आहे. या धोरणाविषयी जिल्हयातील सर्व दुग्ध संस्थानी सावधगिरी बाळगावी व एकत्रीत येऊन लढा देण्याची आवश्यकता आहे.. भविष्यात दुग्ध उत्पादन करताना संस्थाना कठीण होऊन संस्था अडचणीत येणार आहेत. सिंधुदुर्ग दुग्ध संघ कीती लोकांचे देणे आहे व या परीस्थीतीत गोकुळने थेट सिंधुदुर्ग दुग्ध संघाकडून दुध घेतल्यास दुध संस्थावर मोठा परीणाम होणार आहे. या दोन्ही व्यक्ती थेट गोकुळकडे जाणारे दुध बंद करण्याच्या मार्गावर आहेत. सतिश सावंत व एम. के. गावडे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात येणारे निर्णय दुग्ध उत्पादक संस्था व दुग्ध उत्पादक शेतकरी यांच्या हिताचे नसून ते भविष्यात अडचणी आणणारे आहेत. एम.के.गावडे यांनी आतापर्यंत किती दुग्ध संस्थाना उभारी दिली आणि त्यांच्याचमुळे किती संस्थाना तसेच दुध उत्पादक शेतकऱ्याना तोटा सहन करावा लागला हे सर्व जिल्हयातील संस्थाना माहीत आहे. यापुढे मी दुग्ध सहकार क्षेत्रातील यांचे सर्व अपयश आपल्या समोर आणणार आहे, असा इशाराही सारंग यांनी दिला आहे.
