चिपी विमानतळ तिकीटवर मुंबई – चिपी किंवा मुंबई – वेंगुर्ला उल्लेख करून त्या गावाला बहुमान द्या…

युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट यांची खासदार राऊत यांच्याकडे मागणी…

वेंगुर्ले: चिपी विमानतळावर सेवा देणाऱ्या एअर इंडीया कंपनीच्या विमान तिकीटावर मुंबई- मालवण (सिंधुदुर्ग) असा उल्लेख करण्यात येत आहे. तरी या विमानतळासाठी अनेक गोष्टींचा त्याग करणाऱ्या चिपी गावातील ग्रामस्थांना त्यांनी केलेल्या कार्याचा अभिमान वाटावा यासाठी एअर इंडीया कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधून विमान तिकीटावरील नाव मुंबई-चिपी (सिंधुदुर्ग) किंवा मुंबई – वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) असे करुन घ्यावे व चिपी गावाला पर्यायाने वेंगुर्ला तालुक्याला बहुमान प्राप्त करून द्यावा अशी विनंती वेंगुर्ला तालुका युवासेनेच्या वतीने युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट यांनी खासदार विनायक राऊत यांनी भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.      या निवेदनात म्हटले आहे की, अलिकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेले चिपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यायाने वेंगुर्ला तालुक्याच्या पर्यटन विकासात मोठी क्रांती घडवेल यात कोणतीही शंका नाही. हे विमानतळ पुर्ण होण्यासाठी आपण खासदार म्हणून नेहमीच अग्रेसर राहून पाठपुरावा केला आहे. या विमानतळासाठी चिपी गावातील भूमीपुत्रांनी कवडीमोल दरात आपल्या जमिनी विमानतळासाठी दिल्यामुळेच हे विमानतळ पुर्ण झाले आहे. मात्र सध्यस्थितीत या विमानतळावर सेवा देणाऱ्या एअर इंडीया कंपनीच्या विमान तिकीटावर मुंबई- मालवण (सिंधुदुर्ग) असा उल्लेख करण्यात येत आहे. तरी या विमानतळासाठी अनेक गोष्टींचा त्याग करणाऱ्या चिपी गावातील ग्रामस्थांना त्यांनी केलेल्या कार्याचा अभिमान वाटावा यासाठी आपण सदर एअर इंडीया कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधून विमान तिकीटावरील नाव मुंबई-चिपी (सिंधुदुर्ग) किंवा मुंबई – वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) असे करुन घ्यावे व चिपी गावाला पर्यायाने वेंगुर्ला तालुक्याला बहुमान प्राप्त करून द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे खासदार राऊत याना करण्यात आली आहे.     यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अशोक दळवी, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर, विश्वनाथ म्हापणकर, युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्नील तळवडेकर, युवासेना उपविभागप्रमुख सुशांत नाईक यांच्यासाहित शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. फोटो: खासदार विनायक राऊत यांना निवेदन देताना पंकज शिरसाट सोबत इतर मान्यवर

You cannot copy content of this page