पुरळ कलंबई शाळेचे शिक्षक श्री. उत्तम मोहिते यांना ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 जाहीर

*💫देवगड दि.२३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पुरळ कलंबई शाळेचे उपशिक्षक उत्तम नामदेव मोहिते यांना २०२० चा ग्लोबल टीचर अवॉर्ड।जाहीर झाला आहे. अक्स वर्ल्डवाइल्ड प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत दरवर्षी जगभरातील उत्कृष्ट शैक्षणिक काम करणाऱ्या शिक्षकांना ग्लोबल टीचर पुरस्कार दिला जातो. सन २०२० हे या संस्थेचे हे तिसरे वर्ष असून ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड २०२० या पुरस्कारासाठी जगातील ११० देशांतील अनेक शिक्षक सहभागी होते. ऑनलाईन शिक्षण व शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर ‘ या कार्याची दखल घेत अक्स या संस्थेमार्फत २०२० चा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड मोहिते यांना देण्यात आले. मोहिते यांना यापूर्वी मायक्रोसॉफ्ट कडून मायक्रोसॉफ्ट Innovative एज्युकेटर एक्स्पर्ट २०१७-१८ चा पुरस्कार देण्यात आला व आयईएसए या संस्थेकडून ‘बेस्ट टीचर ऑफ द इयर अवॉर्ड २०२०’ मिळाला आहे. अध्यापनात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मनोरंजक पद्धतीने अध्यापन केले जाते. शाळा स्मार्ट डिजिटल असून ‘डिजिटल तंत्रज्ञानातून शिक्षण ‘ हा असा उपक्रम त्यांच्यामार्फत शाळेत राबविला जातो. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे या वर्षी ग्लोबल टीचर अवॉर्ड चे वितरण ऑनलाईन प्रकारे करण्यात आले. मेडल, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

You cannot copy content of this page