*💫मालवण दि.२३-:* भुईमुग शेती मध्ये जंगली जनावरांपासुन संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या भल्या मोठ्या सापाला कोकण वाईल्ड लाईफ रेसक्यु फोरमचे मसुरे येथील सदस्य असलेल्या सर्पमित्र रमण पेडणेकर यानी जाळ्यातुन सोडवत जिवदान दिले आहे. मसुरे खाजणवाडी येथील उपसरपंच राजेश गावकर याना भुईमुग शेती मध्ये जंगली जनावरांपासुन संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये भलामोठा सर्प अडकलेला आढळुन आला. लागलीच त्यानी सर्पमित्र रमण पेडणेकर याना संपर्क साधत सर्पाचा जिव वाचविण्याचे आवाहन केले. रमण पेडणेकर यानी येथील उमेश बागवे याना सोबतीला घेत प्रथम जाळ्यात अडकलेल्या सर्पाला जाळे कापुन वेगळे केले. तसेच सर्पाने सुटका करण्यासाठी केलेल्या धडपडी दरम्यान शरीरावर जखम झाली नसल्या बाबत खात्री केली व त्यानंतर सदर सर्पास नैसर्गिक अधिवासात सोडले. जाळयात पुर्णपणे गुरफटुन गेलेल्या पाच फूट लांबीच्या सर्पाची मुक्तता करुन त्याला जिवदान दिल्याबद्दल सर्पमित्र रमण पेडणेकर यांचे कौतुक होत आहे.
भुईमुग पिकाच्या रक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या सापाला जीवनदान
