कणकवली पटवर्धन चौकात ना.जयंत पाटील यांचे स्वागत

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबीद नाईक यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती

*⚡कणकवली ता.३०-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कणकवलीत राष्ट्रवादीतर्फे कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांनी कणकवली पटवर्धन चौकात नाम.जयंत पाटील यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. या स्वागताचा दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, विलास गावकर, सुभाष उर्फ बाबू सावंत, सावळाराम अणावकर, संदीप राणे, नम्रता कुबल, स्नेहल पाताडे, अनिस नाईक, इम्रान शेख, दिलीप वरने, अमित केतकर, विशाल पेडणेकर, सचिन सदडेकर, सतीश पाताडे, वसीम फकीर, विशाल ठाणेकर, उदय भोसले, सुरेश गवस, एम. डी.सावंत, दीपेश सावंत, निशिकांत कडुलकर, गणेश चौगुले, राजू वर्दम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या स्वागता प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी अबिद नाईक यांनी पटवर्धन चौकात भला मोठा पुष्पहार घालून जयंत पाटील यांचे कणकवली नगरीत स्वागत केले.

You cannot copy content of this page