*⚡बांदा ता.२९-:* मडुरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा ऊर्फ बाळू गावडे यांची सलग तिसऱ्या वर्षी एकमताने निवड झाली आहे. मडुरा आरोग्य उपकेंद्राच्या सभागृहात झालेल्या ग्रामसभेत गेल्यावर्षीच्या समितीला मान्यता देण्यात आली. यावेळी सरपंच साक्षी तोरस्कर, उपसरपंच विजय वालावलकर, ग्रामपंचायत सदस्य सखाराम परब, माधुरी वालावलकर, सानिका वेंगुर्लेकर, ग्रामसेवक आदम शहा, पोलीस पाटील नितीन नाईक, माजी उपसरपंच उल्हास परब, नकुल परब, पिंटो परब, दिलीप परब, प्रविण परब, गोपाळ धुरी, शीतल परब, उज्वला परब, रेश्मा परब, पल्लवी परब, विजय माधव, बाबली परब, बाबलो गुरव, सिद्धेश सावळ आदी उपस्थित होते. पोलीस पाटील नितीन नाईक यांनी नुतन अध्यक्ष बाळू गावडे यांचे अभिनंदन केले. ग्रामसभेत विविध विषयांवर साधकबाधक चर्चा झाली. सर्वांना सोबत घेऊन गावातील तंटे गावातच मिटविण्याला प्राधान्य देणार असल्याचे अध्यक्ष बाळू गावडे यांनी सांगितले.
मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बाळू गावडे
