शिवसेना आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांची माहिती…
मालवण (प्रतिनिधी) : मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मालवण तालुक्यातील चिंदर खालची तेरई येथे सभा मंडप बांधणे, वरची तेरई ब्राह्मणदेव मंदिर सभामंडप बांधणे, चिंदर गावठणवाडी येथे सभामंडप बांधणे या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळल्याचू माहिती शिवसेना आचरा विभागप्रमुख समीर लब्दे यांनी दिली आहे मालवण तालुक्यातील चिंदर पंचक्रोशीतील अनेक विकासकामे आम वैभव नाईक यांच्याकडे देण्यात आली होती त्यातील खालची तेरई येथे सभा मंडप बांधणे, वरची तेरई ब्राह्मणदेव मंदिर सभामंडप बांधणे, चिंदर गावठणवाडी येथे सभामंडप बांधणे या कामांना लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांतर्गत मंजुरी मिळाली आहे. सदर कामे मंजूर होण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या जवळ विभाग प्रमुख समीर लब्दे, उपविभाग प्रमुख अनिल गावकर यांनी पाठपुरावा केला होता. सदर विकास कामांसाठी ग्रामस्थ व शिवसैनिक यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानल्याची माहिती विभागप्रमुख समीर लब्दे यांनी दिली आहे.