भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ मेलिंडा परेरा पदव्युत्तर पदवी परीक्षेत देशात १७ वी…

सावंतवाडी ता.-:भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. मेलिंडा परेरा हिने पदव्युत्तर पदवी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून संपूर्ण भारतात १७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. कोणत्याही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस शिवाय तिने हे यश संपादन केले आहे. तिने मिळवलेले हे यश महाविद्यालय आणि सावंतवाडी शहरासाठी भूषणावह आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड दिलीप नार्वेकर, सचिव बाळासाहेब बोर्डेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब पाटील सर्व संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तसेच सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page