*⚡मालवण ता.२९-:* आंगणेवाडीतील जेष्ठ प्रमुख ग्रामस्थ तसेच आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई या संस्थेचे सदस्य डॉ. दिगंबर तुकाराम आंगणे (७५ वर्ष) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले. वैधकीय व्यवसायाची त्यांना चांगली जाण होती. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रा नियोजनात महत्वाची भूमिका ते बजावायचे. आंगणेवाडी येथील श्री भराडी माता रंगमंच येथे होणाऱ्या नाटकांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहिणी, भावोजी, पुतण्या, पुतणी, सून, नातवंडे असा परिवार आहे. आंगणेवाडी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील युवा कार्यकर्ते दिनेश आंगणे यांचे वडील तर गोवा येथील तुकाराम उर्फ बाबू आंगणे यांचे काका होत.
आंगणेवाडी येथील डॉ. दिगंबर आंगणे यांचे निधन
