उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे आवाहन
मालवण दि प्रतिनिधी वकिली क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात झोकून देणाऱ्या ऍड. रुपेश परुळेकर हे युवा पुढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. कोरोना कालावधीत परूळेकर यांनी तालुक्यात निस्वार्थपणे काम करत अनेक कोरोना रुग्णांसाठी ते देवदूत ठरले. रक्तदान शिबिरातून त्यांनी नवे रक्तदाते निर्माण करून युवकांना रक्तदान चळवळीत आणले आहे. रुपेश परुळेकर मित्रमंडळाच्या वतीने यापुढेही अशीच सामाजिक सेवा घडत राहो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले. मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालयात ऍड. रुपेश परुळेकर मित्रमंडळ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन पराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी डॉ. मालविका झाटये, डॉ. अमोल झाटये, वराड माजी उपसरपंच आप्पा परुळेकर, सामाजिक कार्यकर्ते मामा माडये, डॉ. सोमनाथ परब, डॉ. प्रथमेश वालावलकर, पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, ग्रामपंचायत पेंडूर वैष्णवी लाड, वराड ग्रामपंचायत सदस्य उमेश हिर्लेकर, संजय नाईक, संजय पेंडूरकर, समीर चांदरकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर, श्रावणी नाईक, मकरंद सावंत, सुमित सावंत, डॉ. रोहित डगरे, डॉ. हर्षद पवार, सरपंच वराड बबन मिठबावकर, जिल्हा रक्तपेढीचे डॉ. गोडकर, गणेश वाईरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऍड. परुळेकर यांनी जिल्हा रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने कमी वेळात नियोजनबद्ध शिबीर आयोजित केले. रक्ताची गरज लागेल तेव्हा तरुण पिढी निस्वार्थ मनाने पुढे येण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. रक्तदानाने रुग्णाचा जीव वाचतो शिवाय त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळतो. रक्तदान करून आपण पुण्याचे काम करत असतो. त्यामुळे तरुणांमध्ये असणारी भीती दूर करून रक्तदान चळवळीत आणण्याचा आमचा उद्देश आहे. शिबीराचे नियोजन बंड्या माडये, विष्णू लाड, मंदार गावडे, निलेश बांदिवडेकर, जगदीश परब, रुपेश पाटकर, राहुल चव्हाण, अमोल परब, रवींद्र परुळेकर, दीपक आचरेकर, देवेन भोगटे, अमित पालव, विजय बांदिवडेकर, भूषण परब, विनय भगत, विकी गावडे, वैभव म्हाडगूत, मेघश्याम मसुरकर, चैतन्य परुळेकर, ऍड. अक्षय सामंत, ऍड. समृद्धी आसोलकर, अवधूत मसूरकर, भालचंद्र मिठबावकर, रोशन पांचाळ, शुभम मसुरेकर, लवू परुळेकर यांनी केले. सूत्रसंचालन नाईक तर आभार पेंडूरकर यांनी मानले. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल १३३ रक्तवीरांनी रक्तदान करून नवा विक्रम रचला. रुपेश परुळेकर मित्रमंडळाच्या वतीने रक्तदात्याना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. *फोटो* : कट्टा येथे ऍड. रुपेश परुळेकर मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले. *फोटो* : कट्टा येथे ऍड. रुपेश परुळेकर मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.